अकोला : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील मशिदीवर लागलेले भोंगे उतरावावे, असा निर्णय सरकारने घ्यावा. जर सरकारने निर्णय घेतला नाही तर मशिदीसमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. यानंतर राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली होती.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आबेडकरांनी सडकून टीका केली होती. त्यावेळी सुजात यांनी ब्राम्हण समाजाला लक्ष्य करत उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण दंगली घडवण्याचे काम करतात आणि त्यात बहुजन समाजाची पोर उतरतात, असं ते म्हणाले होते.
यासोबतच अमित ठाकरे यांनी स्वत: हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हानही दिलं होतं. यासगळ्यानंतर राज्यात सुजात यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याच्या चर्च्या चांगल्याच रंगत आहेत. मात्र यावर आज अकोल्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना, प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.
“सुजातने एमएससी केलं आहे. त्याला अजून शिकायचं आहे. तो शिक्षणासाठी बाहेर जातोय. तसेच तो पूर्णवेळ शिकायला जाणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तर शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याने राजकारणात यायचं नाही हे मी त्याला सांगितलं आहे.” प्रकाश आंंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर सुजातची राजकारणात एन्ट्री होणार की नाही या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
- “तुम्ही शेण खाता आणि दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेता”; राऊतांचा सोमय्यांना टोला
- “सगळ्या अपेक्षा राज ठाकरेंकडूनच का?” – तृप्ती देसाई
- “घरगुती मुख्यमंत्री अखेर…” ; सदाभाई खोतांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- “अच्छा दिखने के लिये नही,अच्छा बनने के लिये जियो”; संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

