पुणे : मुंबई इंडियन्सचा कप्तान रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या टी-२० मध्ये १० हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२२मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात रोहितने हा टप्पा गाठला. तो २८ धावा करून बाद झाला.
रोहित शर्माने ३६२ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने २९९ डावात ही कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार ठोकत रोहितने १० हजार धावांचा टप्पा गाठला. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. चालू मोसमातील ५ सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
असा रंगला सामना…
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईला १२ धावांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या रोहितने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. शिखर धवन, मयंक अगरवाल यांनी अर्धशतके ठोकत पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकात १८६ धावांपर्यंतच पोहोचता आले. शेवटच्या काही षटकात मुंबईने महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि पंजाबने सामना हिसकावून घेतला.
महत्त्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : जे कोणालाही जमलं नाही ते ‘गब्बर’नं करून दाखवलं; मुंबईविरुद्ध धवननं रचला वर्ल्ड रेकॉर्ड!
- IPL 2022 : “मला वाटलं की…”, मुंबई इंडियन्सच्या सलग पाचव्या पराभवानंतर रोहित काय म्हणाला बघा!
- IPL 2022 : रोहित शर्माला २४ लाखांचा दंड; मुंबई इंडियन्सवर ‘मोठी’ कारवाई!
- सुजात आंबेडकरांची राजकारणात एन्ट्री ?, प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा खुलासा
- इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

