अहमदाबाद: कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंड संघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यांत भारतीय संघाने नाणेफेक गमावली. इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केल. सलामीवीर रोहितच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढ कोलमडली. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये १२४ धावा केल्या. यामध्ये हार्दीक पांड्याची त्याला साथ मिळाली
इंग्लंडच्या संघाने सावध खेळी करत २ गडी गमावत सोळाव्या षटकातच भारताचा दारुण पराभव केला. इंग्लंड संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर टी-२० क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावरील डेवीड मलानने विजयी षटकार मारुन मालिकेतील इंग्लंडच्या पहिल्या विजयाची नोंद केली. टी-२० मालिकेची विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. पुढील सामन्यात भारतीय संघ जोरदार कमबॅक करेल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माला या सामन्यातून वगळण्यात आलं होत.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

