🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करवी लागत आहे.
आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला. आयपीएल जरी स्थगित झाली असली तरी खेळाडूंना वारंवार आयपीएलची आठवण येताना दिसत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने मायदेशी परतल्यानंतर भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. भारतातील स्थित लवकर सुधरावी याच्यासाठी देखील प्रार्थना केली आहे.
India is a special country going through a very difficult time. Thank you for welcoming me and my family like you always do. Please stay safe and look after yourselves ???????? pic.twitter.com/DnNdFKkuO2
— Jos Buttler (@josbuttler) May 5, 2021
जॉस बटलरने ट्विट करून भारताविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘भारत हा खूप खास देश जो सध्या कठीण परिस्थितीतून जातोय. माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे, जसं स्वागत तुम्ही नेहमी करता. सुरक्षित रहा, आपली काळजी घ्या’, असं आवाहनही त्याने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुतळ्यांसाठी २० हजार कोटी आहेत, मग लसीकरणाला ३० हजार कोटी नाहीत का?’
- बंगाल हिंसाचाराचा निषेध अंगलट, बीडमध्ये प्रवीण दरेकरांवर गुन्हा
- ‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र
- ‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी
- धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
