🕒 1 min read
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.
या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून आला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर काल भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.
यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. यानंतर, इंग्लंडने भारताला दिलेलं ४९ धावांचं लक्ष्य अगदी सहजपणे गाठलं आहे. बिनबाद ४९ धावा करत भारताने ही कसोटी मालिका आपल्या खिशात घातली आहे. दुसऱ्या दिवशीचं तिसरं सत्र सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा विजय मिळवला.
रोहित शर्मा ने २५ चेंडूंमध्ये २५ धावा तर शुबमन गिलने २१ चेंडूत १५ धावा केल्या. यामुळे भारताने १० विकेट्स राखून हा विजयश्री मिळवला. दरम्यान, या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारच…! अक्षर पटेलच्या फिरकीची जादू एकाच कसोटीत घेतले ११ बळी
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
