Share

मोठी बातमी : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीमुळे खळबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. पोलीस आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं.

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे घटना स्थळी पोहचलेले आहेत. हा सर्व परिसर अतिशय उच्चभ्रू मानला जातो. अनेक मंत्र्यांचे बंगले याच परीसरात आहे. याच अनुषंगाने हा मुंबईतील एक महत्वाचा भाग मानला जातो.

दरम्यान ज्या गाडी मध्ये हे स्फोटके भरलेले आहेत त्या गाडीचा नंबर आणि मुकेश अंबानीच्या गाडीचा नंबर हा एकच असलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सर्व घटनेला घातपाताचे स्वरूप मिळालेले आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यावर यांनी सांगितले कि. ‘या वाहनाचा रंग घालवलेला आहे. वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. स्फोटकं का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणं चुकीचं आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिली.

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!