औरंगाबाद : इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. त्यातच आज गॅस २५ रुपयाने महागल्यामुळे किचनमधील अर्थव्यवस्था पुन्हा ढासळली आहे. गेल्या महिनाभराच्या कालखंडात तब्बल तीन वेळेस दरवाढ होऊन गॅस शंभर रुपयाने वाढला. तर गेल्या दोन महिन्यात गॅस दोनशे रुपयांनी वाढला. एकीकडे इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सबसिडीची अपेक्षा असते. परंतू ज्या वेळेस ७२० रुपये सिलेंडरची किंमत होती, तेव्हा ९ रु.९५ पैसे सबसिडी मिळत असे. आता सिलेंडरची किंमत ८२० रुपये झाली आहे. तरीही सबसिडीही केवळ ९.९५ पैसेच येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भीक देण्यापेक्षा महागाईचं कुत्रं आवरावं अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यंदा फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅसची दरवाढ झाली आहे. चार फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा एका सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर ७७९ वरून ७९४ रुपयांवर झाला आहे. तर बीडमध्ये याच सिलेंडरची किंमत ८२० वर जावून पोहोचली आहे.
चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आता ८१० रुपये, कोलकात्यात ८२० रुपये झाली आहे. या महिन्यात तिसऱ्या वेळेस दरवाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यात सिलेंडरच्या किमतीत शंभरची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैरान झालेल्या सामान्यांना गॅस दरवाढीमुळे धक्का बसला आहे. या दरवाढीमुळे मध्यमवर्गियांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास
- दिवंगत विमलताईंचे स्वप्न सून नमिता मुंदडाकडून पूर्ण
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
