🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
याच प्रकरणा संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्याचा दौरा करत ज्या इमारतीवरून पूजा चव्हाणने उडी मारत जीवन संपवलं त्या इमारतीची पाहणी केली. यानंतर, त्यांनी थेट वानवडी पोलीस ठाण्यात दाखल होत सदर प्रकरणाच्या चौकशी बाबत पोलिसांना विचारणा केली. पुणे पोलिसांची भूमिका ही संदिग्ध असून ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत आहेत त्यावरून साफ समजतय की ते अत्यंत दबावात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्या आक्रमक झाल्या असून आज त्यांनी पोलिसांवर देखील आगपाखड केली आहे. दरम्यान, भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी चित्रा वाघ यांच्या या लढाऊ बाण्याचं कौतुक करताना शिवसेनेला डिवचलं आहे.
‘स्वतःला वाघ आणि आम्हीच वाघाची डरकाळी काढू म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम चित्राताई वाघ यांनी केले. खरे वाघ असाल तर चित्राताई वाघ यांच्यासारखे वागा. शेळ्या-मेंढ्यांसारखे वागू नका. महाराष्ट्रातील आई, बहीण यांची अब्रू आणि सुरक्षा राखायची असेल तर खरंच वाघासारखे वागा,’ असं भाष्य आशिष शेलार यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …हे मोदी सरकारच्या चिवट झुंझीचं यश; नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला : निलेश राणे
- १० दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार ; ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
