🕒 1 min read
मुंबई : रोहित पवार म्हणाले, “आरक्षणाबाबत कुणाचा इतिहास काय आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ओबीसी आरक्षणासह इतरही सर्वच प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे.” याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत नवीन विधेयक आणण्याची घोषणा केली असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात आला. या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ झाला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले या महापुरुषांचा अवमान होत असताना मिठाची गुळणी धरून गप्प बसायचं आणि ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी आंदोलन करायचं, हे भाजपचं ‘सिलेक्टिव्ह’ राजकारण आहे,” अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, “राज्यात शहरी व ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, महिला, रोजगार अशा अनेक विषयांवर सभागृहात सखोल चर्चा होऊन हे प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. पण त्याऐवजी सभागृह बंद पाडून जनतेचा पैसा वाया घालवला जातोय. हे जबाबदार विरोधी पक्षाचं लक्षण नाही. वास्तविक विरोधकांनी केंद्र सरकारशी चर्चा करून आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा उठवली तर ओबीस, धनगर व मराठा आरक्षणाचाही प्रश्न कायमचा निकाली निघेल. पण मला वाटतं हे प्रश्न सोडवण्याऐवजी ‘पुन्हा -पुन्हा’ राजकीय पोळ्या भाजण्यातच विरोधकांना अधिक रस असल्याचं दिसतं.”
‘ओबीसी आरक्षणाची हत्या केली’; प्रविण दरेकरांचा आरोप
मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
