बुलडाणा: आज पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्रांने स्वतःची व्हिडिओ चित्रफीत तयार करून आज महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केली आहे. या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे.
रविकांत तुपकर म्हणाले, ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून आहे. ऊर्जा मंत्र्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे, लॉकडाउन काळात भरमसाट आश्वासने देऊन ठेवली तर अव्वाच्या सव्वा बिल तुम्ही शेतकऱ्याला देताय. लाज वाटली पाहिजे सरकारला शुल्लक गोष्टीवरून अधिवेशन बंद पडतात.. किती शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना तुपकर म्हणाले, या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? मी शेतकऱ्यांच्या पुत्रांना सांगतो की, आत्महत्या करायची नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. तुमच्यावर आलेली गोळी पहिली आमच्या छातीवर घेऊ पण आत्महत्या करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IND VS SRI 1st TEST MATCH : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ६ बाद ३५७ धावांसह भारत मजबूत स्थितीत
‘मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने विचार करून बोलावं’; अजित पवारांचा राज्यपालांना सल्ला
“पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेणार नाही…”, व्हिडीओ शूट करत युवा शेतकऱ्याची आत्महत्या
सरकार तर्फे मातृवंदना योजनेत मोठा बदल! दुसरे अपत्य झाले तरी घेता येणार योजनेचा लाभ…
‘आपल्या दहशतीमुळे विधानसभा तहकुब करून सरकार पळून गेलं’- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

