Share

मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज..

Published On: 

मुंबई : राज ठाकरे हे नाव घेतलं तरी त्यांची धारदार भाषणं, त्यांनी साकारलेली व्यंगचित्र असं सगळं डोळ्यांपुढे येतं. याशिवायही त्यांची एक ओळख आहे. राज ठाकरे हे एक मोठे कलाप्रेमीही आहेत. चित्रकला असो वा चित्रपट यांच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे. क्चचित प्रसंगी त्यांच्यात दडलेली हा खास माणूस सर्वांसमोर येतो. आता राज ठाकरे यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरला आवाज दिलाय. चित्रपटाचं नाव आहे,’हर हर महादेव’.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा, मराठी माणसाच्या हृदयात वसलेली, महाराष्ट्राच्या बुलंद आवाजातली स्वराज्याची सुवर्णगाथा सांगणाराअभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि या टीझरला राज ठाकरे यांनी आपला आवाज दिलाय.टीझरचं पहिलं वाक्य कानी पडताच, राज यांचा दमदार, बुलंद आवाज खिळवून ठेवतो. पुढे तर टीझरमधील राज यांच्या आवाजातील प्रत्येक वाक्य ऐकताना अंगावर जणू शहारा येतो.‘ जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता.

ही ३५० ववर्ष्यानंतरच्या पहाटफुटीचीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माज्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव…,’ असा राज ठाकरे यांच्या आवाजातील हा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. झी स्टुडिओ आणि गणेश मार्केटींग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!