नवी दिल्ली : करोनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम केला असला तरी देशातील धनदांडगे आणि उद्योजकांना मात्र आणखी श्रीमंत केले आहे. गरीब, मजूर, कामगार एका-एका घासासाठी महाग झाले होते. तर काहींनी हजारो किलोमीटर पायपीट करत आपलं घर गाठलं होतं.
मात्र, दुसरीकडे अहवालानुसार गेल्या वर्षभरात देशातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. याच करोना संकटकाळात देशातील अब्जाधीशांच्या यादीत आणखी ४० नव्या अब्जाधीशांचा समावेश झाला आहे.
हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता भारतात राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या १७७ इतकी झाली आहे. जवळपास ८३ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसोहत मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. या कालावधीत त्यांच्या संपत्तीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२० या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ होऊन की ३२ अब्ज डॉलर्स इतकी झाली. यानंतर अदानी यांनी ४८ व्या स्थानावरून थेट २० व्या स्थानावर झेप घेतली. तर ते दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. गौतम अदानी यांचे बंधू विनोद यांच्या संपत्तीतही १२८ टक्क्यांची वाढ होऊन ती ९.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
करोना संकटामुळे आर्थिक विकास दर उणे ७ टक्के झाला होता. केंद्र सरकारने करोना रोखण्यासाठी कठोर टाळेबंदी लागू केली होती. ज्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर झाला असल्याचे ‘हुरुन इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अॅनस रहमान यांनी सांगितले. भारतात सायक्लिकल इंडस्ट्रीच्या जोरावर उद्योजकांची मालमत्ता वाढली आहे. याउलट अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमधून संपत्ती निर्माण केली जाते, असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होऊ शकली नाही
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात, एखाद्या राज्यमंत्र्यांसारखं वागू नका’
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची ‘बैलगाडी’ रोखली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

