मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारची कोंडी करत असल्याचं दिसून येत आहे.
काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरत सभात्याग देखील केला होता. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भाजप आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार, मेट्रो कारशेड, यवतमाळ मधील घोटाळा, विजबिल आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरलं आहे.
दरम्यान, आज शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात वाकयुद्ध रंगल्याच दिसून आलं. यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या प्रकरणाला १५ महिने उलटून देखील अधिकाऱ्यांची कोणतीच चौकशी वा कारवाई गेली जात नसल्याचे सांगत हे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला आहे.
त्यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत, ‘सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल,’ असा खुलासा केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार शिंदेंना उद्देशून म्हटले की, ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’ असं विधान मुनगंटीवार यांनी करताच आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असं थेट त्यांनी सभागृहातच म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- 5 कोटी न दिल्यास मुलाला ठार करू; दिग्गज भाजप आमदाराला धमकीचे पत्र
- मोनी रॉयच्या ब्लॅक बिकिनीने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ !
- ‘लहान लेकरांच्या तोंडचा घास काढून चिक्की घोटाळा केला, तेव्हा नैतिकता म्हणून राजीनामा का नाही दिला ?’
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?


