Share

‘खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत? बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत? यामागे काय षडयंत्रं आहे, जर खरोखरच हिंदू असुरक्षित आहे, असं वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. मोदी-शहांना जाब विचारावा. आम्ही तुमच्या सोबत येऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोहन भागवतांना खुलं आव्हान दिलं आहे.

काश्मीरमधील पंडितांच्या हत्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगालदेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. हिंदू खरोखरच खतरे में है असं वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवतांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं, करणार आहात का नेतृत्व? हिंदूंबाबत आपल्या देशात काय चाललं आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!