मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका लावून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यावर ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटांसाठी ज्या माणसाला इथं आणलं त्याचा अर्थ दोघांनीही राष्ट्रद्रोह केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा’, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आज गोंदिया येथे काँग्रेस मेळावा पार पडला. यावेळी नाना पटोले यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखल देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘ईडी आमच्यावर लावतात म्हणून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आमचेच मित्र पक्ष याची सुपारी घेत असल्याचे आपण पाहतो. या पद्धतीच्या चौकशा करून प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसंच, फडणवीस यांनी राज्याच्या एका मंत्र्यावर आरोप केले. अंडरवर्ल्डकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्याच मंत्र्याने माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, यामुळे त्या दोघांनी राष्ट्रद्रोह केल्याचे होत आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारला विनंती केली की या प्रकरणात चौकशी करून दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,असं पटोले यांनी सांगितलं. तसंच, आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्राचे राजकारण गुन्हेगारीकडे जात आहे. हे आता कुठे तरी थांबले पाहिजे, असंही पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर
- राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल
- ‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’
- राज्य सरकार रझा अकादमीवर का कारवाई करत नाही?; किरीट सोमय्या
- तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

