Share

राज्य सरकार रझा अकादमीवर का कारवाई करत नाही?; किरीट सोमय्या

Published On: 

मुंबई : त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातही नांदेड, अमरावती, मालेगाव या शहरांत दंगली उसळल्या, यात मोठे नुकसान झाले आहे. यावर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. या दंगली उसळण्यास कारणीभूत रझा अकादमी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे भडकाऊ भाषणे आहेत, मशिदीच्या नावाने खोट्या बातम्या परसरवल्या भडकाऊ भाषणे केली. ठाकरे सरकार या दंगोखोरांना का अटक करत नाहीत? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. सोमय्या म्हणतात, ठाकरे, पवार सरकार महाविकास अघाडीच्या भडकाऊ भाषणे करणाऱ्या नेत्यांना आणि रझा अकादमीच्या दंगेखोरांना का अटक करत नाही. ज्यांनी वोट बँकेसाठी मशिदीच्या नावाने खोट्या बातम्या पसरवल्या, भडकाऊ भाषणे केली. अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम धर्मीयांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या विरोधात रझा अकादमीने आक्रमक होत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बंद पुकारत मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चादरम्यान महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव या शहरात मोर्चांना हिंसक वळण मिळाले. यातून पोलिसांवर हल्ल्यांबरोबरच मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यावर आता भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर टीका करत रझा अकादमीवर बंदीसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!