Share

मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे- प्रविण दरेकर

Published On: 

पुणे : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 8वा दिवस आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी प्रविण दरेकरांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. त्यामुळे मला एसटी कामगारांच्या व्यथा माहित आहेत. तुटपुंजा पगार, अपुऱ्या सोयी-सुविधा यामुळे आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचारी दबला गेला आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. प्रविण दरेकर यांनी तळेगाव दाभाडे येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी भेट देऊन दरेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तळेगाव दाभाडे शहर भाजपच्या वतीने प्रविण दरेकर यांचे स्वागत करण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा व्यक्त करत आपल्या नगर दौऱ्यादरम्यान दरेकर यांनी सर्व आंदोलन स्थळी भेट दिली. तळेगाव दाभाडे एसटी डेपो येथे बोलताना प्रविण दरेकर यांनी एसटीचे विलिनीकरण करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांची ससेहोलपट थांबवावी असे सांगितले. मी सुद्धा एसटी कंडक्टरचा मुलगा असल्याने एसटी कामगारांच्या व्यथा मला माहित आहेत. तुटपुंजा पगार, अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचारी दबला गेला आहे. महाराष्ट्र सरकारने आंदोलन दाबण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!