Share

राज कुंद्रा-शिल्पाच्या अडचणीत वाढ; व्यावसायिकाने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे.

राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या दोघांविरोधात मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खान यांच्याविरोधात एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. २०१४ मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी फिटनेस संबंधित एका व्यवसायात १ कोटी ५१ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते.

ही गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांनी याबाबत काहीही सुरळीत न झाल्याने मी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी मला धमकी दिली, असा आरोप व्यावसायिकाने केला आहे. आता यावरून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर पुढे कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!