Share

‘काँग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे’

Published On: 

भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा धूसफूस झाल्याचं पाहायला मिळालं. तरीही महाविकास आघाडी सरकारमधील नेते ‘आमच्यामध्ये सर्व काही छान चाललं असल्याचं वारंवार सांगत असतात. अधूनमधून एकमेकांवर कुरघोड्यादेखील करत असतात. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप म्हणजेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वादात कॉंग्रेस शांत आहे. पण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता एक वक्तव्य केलं आहे.

कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच सहकारी मित्रपक्षाने घेतली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीती धूसफूस आता चव्हाट्यावर आली असल्याचं पाहायला मिळत आहे.

ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. आमच्यावर ईडी लागत आहे. म्हणून कॉंग्रेसला बदनाम करणारी लोक आमच्या मित्रपक्षात आहेत, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे.

नाना पटोलेंनी हे सर्व सांगताना ‘मित्रपक्ष’ असा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस की शिवसेना, हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी कोणी घेतली?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!