Share

IND vs WI: भारत विरुद्ध विंडीजचा पहिला टी २० सामना आज रंगणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वेस्ट इंडिजला एकदिवसीय मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर आज भारतीय संघ आगामी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी २० आंतरराष्ट्रीय सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसारखा निकाल टी-२० मालिकेतही मिळवण्यासाठी रोहितची पलटण तयार असेल.

भारतीय संघ सध्या आत्मविश्वासाने भरलेले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, त्यांनी एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. तसेच त्यांनी शेवटच्या शेवटच्या टी २० मालिकेत न्यूझीलँडला ३-०ने व्हाईटवॉश नोंदवला होता. तीच कामगिरी वेस्ट इंडिजविरुद्धही करण्यास टीम इंडिया मैदानावर उतरेल. उपकर्णधार असलेला केएल राहुल हाताच्या दुखापतीमुळे मालिकेसाठी अनुपलब्ध आहे. त्याच्या जागी रुतुराज गायकवाडचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, इशान किशन आधीच संघात असल्याने,ऋतुराज प्लेयिंग इलेव्हन मध्ये असण्याची शक्यता कमी आहे. मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे खेळाडू खेळतील.

मालिकेच्या सुरुवाती आधीच भारतीय संघाचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. ज्यात के एल राहुल , रवींद्र जडेजा , आर अश्विन आणि वाशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. ज्यामुळे आता भारतीय युवा वेगवान गोलंदाजांना खेळण्याची मोठी संधी मिळणार आहे. भुवनेश्वर कुमार हा आक्रमणाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला एम सिराज, हर्षल पटेल आणि आवेश खान यांसारख्या युवा गोलंदाजांची साथ मिळेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!