Share

IPL 2022: कोच नेहराच्या बोलण्यावर गुजरात टायटन्स ‘या’ तीन खेळाडूंना विकत घेणार!?

Published On: 

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख जशी जशी जवळ येतीये तसेच कोणता संघ कोणत्या खेळाडूला विकत घेणार या चर्चनाही उधाण आला आहे. खेळाडूंसोबत चाहतेही या मेगा ऑक्शनसाठी उत्सुक आहेत. यावेळी अजून दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात अहमदाबाद टायटन्स आणि लखनऊ सुपरजाईंट्स यांचा समावेश आहे. या दोन संघानी मेगा ऑक्शनसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. आशिष नेहरा यापूर्वी अनेक संघांसाठी खेळला आहे आणि त्याने आरसीबीसोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे नेहराला अनुभव आहे आणि याचा फायदा अहमदाबादला मेगा ऑक्शनमध्ये मिळू शकतो. नेहराजींच्या बोलण्यावर अहमदाबाद संघ मुख्यतः टी नटराज , देवदत्त पडिकल आणि युझवेंद्र चहल याना निशाणा करू शकते.

आयपीएलच्या भारतीय संघाला अनेक वेगवान गोलंदाज दिले आहेत. ज्यात तामिळनाडूचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याचेही नाव आहे. आयपीएलमध्ये २४ सामन्यांत २० विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहल भारतीय संघातील मुख्य फिरकीपटूपैकी एक आहे. यामुळे नेहराला त्याची प्रतिभा माहिती आहे. तसेच युवा फलंदाज देवदत्त पडिकलही नेहराच्या रडारवर आहे. पडिकलने आरसीबीकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. आशिष नेहराने याआधीही पडिकलचे खूप कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!