मुंबई : काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. तद्पश्चात राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटलेला दिसून येत आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगत आहे. असे असतांनाच आज(११ फेब्रु.)पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी सोमय्यांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून त्या म्हणाल्या आहेत की,‘आज पुन्हा पुणे पालिकेत, लबाड लांडगा ढोंग करतंय ,आणा रे पायरी आणि कर सत्कार त्याचा एवढेच राहिले होते, तेही पूर्ण. लावा रे तो पायरीवरून घसरलेला व्हिडीओ. होऊन जाऊद्या खरे-खोटे कारण आता ड्रामा उघडा पडलाय ’,असे म्हणत रुपाली पाटलांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
https://www.facebook.com/947239435316421/posts/7235967753110193/?sfnsn=wiwspmo
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आजच्या पुणे दौऱ्यासंदर्भात माहिती दिली असून सकाळी ९.४० वाजता ते पुणे दौऱ्यासाठी दिल्लीमधून निघतील. ११ वाजून ३० मिनीटांनी ते पुण्यात पोहचणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंचा फडणवीसांसोबत बंद खोलीत संवाद; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- “त्यांनी माझ्या वाट्याचे श्रेय घेतले”; अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा
- आश्चर्यम! छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटल न जाता नितेश राणे थेट मोदींच्या सभेत
- ‘तो’ तर चहलच्या खिशात; डीजे ब्रावोचा विंडीज कर्णधारावर निशाणा
- ‘त्या’ घटनेनंतर किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर


