Share

“राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग?”, भातखळकरांचा शरद पवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रावरही उमटत आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हिंदू महिलांनीही हिजाब परिधान करुन हिजाबचे समर्थन केले होते. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ रॅली काढून हिंदू महिलांना हिजाब घालण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. हा राष्ट्रवादी पक्ष आहे की मुस्लीम लीग? असा सवाल अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना ट्वीट करत केला आहे. तसेच यांना जिना बनण्याचे वेध लागलेले दिसत असल्याचे म्हणत टोलाही लगावला आहे.

दरम्यान बीडमध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीकडून रॅली काढण्यात आली होती. घटनेने प्रत्येकाला मूलभूत हक्क दिले आहेत. त्यामुळे घटनेने दिलेले अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु नका. तो आमचा अधिकार आहे, असं म्हणत बीडमध्ये मोर्चेकरी महिलांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!