Share

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुध्द दुसरा टी २० सामना जिंकत भारतीय संघाने रचले किर्तीमान

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजला ८ धावांनी पराभूत केले आहे. तसेच तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेत भारतीय संघाने २-० ने मालिका सुद्धा जिंकली आहे . भारतीय क्रिकेट संघासाठी हा इतिहासातील १००वा टी २० विजय ठरला आहे.

वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने विंडीजला १८६ धावांचे लक्ष्य दिले. ज्यात भारताकडून सलामीवीर ईशान आणि रोहित कमी धावसंख्येयवर पॅव्हेलियन मध्ये परतल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी शानदार अर्धशतकी पारी खेळली. तर गोलंदाजीत विंडीजच्या रोस्टन चेसने ३ विकेट्स पटकावल्या.

भारताच्या १८६ धावांचे पाठलाग करताना विंडीजचा संघ ७ विकेट शिल्लक असतानाही २० ओव्हरमध्ये धावा पूर्ण करू शकले नाहीत. आणि भारतीय संघाने केवळ ८ धावांनी सामना आणि मालिका विजय निश्चित केला. रोहित शर्माच्या कर्णधारपदात हि दुसरी मालिका भारतने जिंकली आहे. या सामन्यात फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीच्या बॅटलाही सूर गवसला आहे. त्यामुळे चाहते अधिक आनंदी आहेत. तिसरा आणि शेवटचा टी २० सामना रविवारी (२० फेब्रुवारी) रंगणार आहे. ज्यात भारतीय संघ पुन्हा विंडीजला क्लीन स्वीप करायचा प्रयत्न करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!