Share

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल

Published On: 

पटना: देशात सध्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. या सर्व विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. त्यामुळे प्रचार जोरदार चालू आहे.

आज पंजाब राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार थंडावला. रविवार दिनांक २० मार्च रोजी पंजाब राज्यात विधानसभेसाठी निवडूक होणार आहेत. पंजाबमधील ११७ जागांसाठी मतदान दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंजाब निवडणुकीसाठी प्रचार करत असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी आणि  बिहारमधील जनतेच्या बाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. युपी बिहारी जनतेला आपण पुन्हा सत्तेवर आल्यास पंजाब राज्यातून कायमचे हाकलून लावू असे वादग्रस्त विधान पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केले होते. यावरूनच बिहारमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला असून चन्नी यांच्या अटकेची मागणी पण बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष कुमार सिंह यांनी केली आहे.

मनीष कुमार सिंह हे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.चरणजीत सिंग चन्नी हे एक देशातील अत्यंत महत्वाच्या पदावर असून त्यांनी केले हे वादग्रस्त वक्तव्य प्रचंड चुकीचे असून त्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडा बसत असल्याचेही मनीष कुमार सिंह यांनी म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!