🕒 1 min read
बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शाळेत जाताना धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालायला परवानगी द्यावी याकरता आंदोलन करण्यात आले. या कर्नाटकमधील हिजाब वादाचे पडसाद देशभरात उमटले आहेत.
त्यातच आज कर्नाटक उच्च न्यायालयात कर्नाटक सरकारने हिजाब प्रकरणी आपले म्हणणे मांडले आहे. हिजाब परिधान करणे हे इस्लामिक प्रथांचा भाग आजिबात नाहीये तसेच हिजाब घालण्यापासून कोणाला रोखणे हे भारतीय राज्यघटना कलम २५ चे उल्लंघन नाही असं मत आज कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात मांडले आहे. काही मुस्लिम संस्थांकडून हिजाब घालायला रोखणे म्हणजे भारतीय राज्यघटना कलम २५ चे उल्लंघन असल्याचे मत होते. या हिजाब वादावर कर्नाटक सरकारमार्फत कर्नाटक सरकारचे महाधिवक्ता प्रभुलिंग नवदगी यांनी उच्च न्यायालयालायात सरकारची बाजू मांडली.
कर्नाटक सरकारची बाजू मांडताना प्रभुलिंग नवदगी म्हणाले कि, ” हिजाब परिधान करणे हे कुठल्याही इस्लामिक प्रथेमध्ये बसत नाही आणि त्यामुळे हिजाब घालण्यावर बंदी आणणे म्हणजे भारतीय राज्यघटना कलम १९ आणि २५ चे उल्लंघन होत नाही असे परखड मत त्यांनी कर्नाटक सरकारमार्फत कर्नाटक उच्च न्यायालयात मांडले.
महत्वाच्या बातम्या :
- विराट कोहली, ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरची धुवदार फलंदाजी ; भारताचे वेस्टइंडीज समोर १८७ धावांचे लक्ष
- बाबर आझम सोबतच्या वादाबद्दल वसीम अक्रमने केला खुलासा म्हणाला…
- “असं वाटतंय विरोधक दररोज रात्री कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करतात”, केजरीवालांचे टीकास्त्र
- IND vs WI: तिसऱ्या टी- २० सामन्यासाठी ईडन गार्डनवर असणार चाहत्यांची उपस्थिती
- बॅनर्सवर गडकिल्ल्यांची माहिती; मावळा प्रतिष्ठानकडून अनोखा उपक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
