Share

IND vs WI: तिसऱ्या टी- २० सामन्यासाठी ईडन गार्डनवर असणार चाहत्यांची उपस्थिती

Published On: 

मुंबई: भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या तिसऱ्या टी २० सामन्यासाठी मैदानावर चाहत्यांची गर्दी दिसणार आहे. बीसीसीआयने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला (CAB) परवानगी दिल्यानंतर रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्याला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती असेल. पहिल्या दोन सामन्यासाठी हॉस्पिटॅलिटी एरिया आणि क्लब हाऊसच्या वरच्या स्तरावर काही गर्दीला परवानगी देण्यात आली आहे.

सीएबीने बीसीसीआयला ईडन गार्डन येथील सर्व स्टँडच्या वरच्या ब्लॉकमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, क्रिकेट बोर्डाने केवळ मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी परवानगी दिली आहे. “इतर ओबींशी चर्चा केल्याप्रमाणे, तुमच्या विनंतीनुसार, तुम्ही ईडन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी २० सामन्यात प्रेक्षकांसाठी स्टेडियम उघडू शकता,” बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कॅब प्रमुख अविशेक दालमिया यांना ईमेल केला आहे.

अहमदाबादमध्ये झालेली वेस्ट इंडिज विरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका बंद दाराआड खेळली गेली होती. बंगालमध्ये मात्र कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या आकडेवारीनुसार त्यामुळे बीसीसीआयने प्रेक्षकांना परवानगी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!