Share

Ind Vs Wi 1st T20: “दात नको दाखवू, बॉलिंग कर”; रोहितने चहलला लाइव्ह मॅचमध्ये केले ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताने पहिल्या टी -२० मध्ये वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघ १-० ने पुढे आहे. टीम इंडियाच्या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. हिटमॅनने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. त्याने झंझावाती ४० धावा केल्या.

रोहित शर्मा कर्णधार बनल्यानंतर टीम इंडियामध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत आहे. सर्व खेळाडू उत्साहात आहेत आणि सामन्यादरम्यानही खेळाडू विनोद करत आहेत. हिटमॅन स्वत: सामन्यात सहकारी खेळाडूंशी थट्टा मस्करी करतो.

पहिल्या सामन्यात, हे दृश्य पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या डावात पाहायला मिळाले, जेव्हा लेगस्पिनर युझवेंद्र चहलला रोहित शर्माने ट्रोल केले होते. रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चहलला दात न दाखवण्यास सांगत आहे. आता प्रश्न असा आहे की कर्णधाराने युझवेंद्रला असे का सांगितले?

युझवेंद्र चहल वेस्ट इंडिजच्या डावातील १५ वे षटक करत होता. पहिल्याच चेंडूवर चहलने पोलार्डला त्याच्या फिरकीने त्रास दिला, पण पोलार्ड कसा तरी धाव घेऊन नॉन स्ट्राइककडे आला. यानंतर युजवेंद्र चहल हसायला लागतो. अशा परिस्थितीत स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा युझवेंद्र चहलला दात न दाखवता पटकन गोलंदाजी करण्यास सांगतो. स्टंप माइकवर रोहितची ही चर्चा सर्वांनी ऐकली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!