हिंदुस्थानी भाऊला १६ दिवसांनी मिळाला जामीन, विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी झाली होती अटक

मुंबई : ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला जामीन मंजूर केला आहे. १ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांची माथी भडकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत वाहनांची तोडफोड केली होती.

विकास फाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी देण्यात आली, त्यानंतर सोमवारी मुंबईतील धारावीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कोरोनाच्या संकटात १०वी आणि १२वीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.

हिंदुस्थानी भाऊ त्याच्या व्हायरल व्हिडीओंमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर ते अधिकच चर्चेत राहिले. यापूर्वी हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील एका स्थानिक वृत्तपत्रात क्राइम रिपोर्टर म्हणून कार्यरत होता. गुन्हेगारी पत्रकारितेसाठी २०११ मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट चीफ क्राइम रिपोर्टरचा पुरस्कारही मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या :