🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर टीका केली होती. त्यात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर देखील निशाणा साधला होता. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना काही प्रश्न विचारले आहेत.
यावेळी मोहित कंबोज म्हणाले, ठाकरे शैली किंवा भाषा ही फक्त आणि फक्त स्वर्गीय श्री हिदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत होती. हिंदुसाठी मंदीरासमान असणाऱ्या शिवसेना भवनात संजय राऊत यांनी वापरलेली भाषा तुम्हाला मान्य आहे का?, राऊतच्या तोंडातून ठाकरे शैली तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘विजय वड्डेटीवार जातीय समिकरणं बदलण्याचा प्रयत्न करतात’ – मराठा क्रांती मोर्चा
-
मुख्यमंत्री चन्नी यांच्या टीकेवर योगी आदित्यनाथांची प्रतिक्रिया; म्हणाले…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तारखेनुसार शिवजयंती मान्य नाही का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
