उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचायचा संजय राऊतांचा डाव आहे का? ” चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप- प्रत्यारोपाचे राजकरण चालू आहे. मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुंबईमधील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांवर आरोप केले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपानंतर आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काही प्रश्न विचारत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बदनाम करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचायचा संजय राऊत यांचा डाव आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. संजय राऊत यांच्या गळ्याशी हे प्रकरण आलं असून आता ते थयथयाट करत आहेत. तसेच राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा संजय राऊत यांचा डाव आहे का ? असाही प्रश्न आज चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पवईतील पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पावरून भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पात जवळपास ४०० कोटींचा घोटाळा केला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून माझ्याकडे कागदपत्र पण आहेत असेही संजय राऊत आज म्हणाले आणि याचे सर्व पुरावे मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे असेही संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रकरणात पडू नये, लोक किरीट सोमय्या यांची धिंड तर काढणार आहेतच पण तुम्ही मधे पडला तर तुमचेही कपडे फाटतील असा धमकी वजा इशारा संजय राऊत यांनी दिला.

यावर आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तुम्हाला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचायचं आहे का असा प्रश्न विचारतच, तुम्ही भारतीय जनता पक्षातील बड्या नेत्यांना बोललेले आम्ही खपवून घेणार नाही.

महत्वाच्या बातम्या :