🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाने टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ६२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.तसेच भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.या सामन्यात ईशान किशनने शानदार ८९ धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक म्हणू असा विक्रम रचला जो पंत किंवा धोनीलाही करता आला नाही.
किशनची (ishan kishan) ८९ धावांची खेळी ही T20 क्रिकेटमधील भारतीय यष्टीरक्षकाची सर्वोच्च धावसंख्या होती. किशनने ऋषभ पंतच्या २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या नाबाद ६५ धावेला मागे टाकले. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५६ धावा केल्या आहेत. त्याने २०१७ मध्ये बेंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध धावा केल्या होत्या. ईशानच्या धमाकेदार ८९ धावांच्या खेळीत दहा चौकारांसह, एका T20I डावात भारतीय यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक चौकारही मारल्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. रॉबिन उथप्पाने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नऊ चौकार मारले होते.
Silencing his doubters – ???????????? ℙ???????????????????? ???????????????????????? way ????
Ishan Kishan now has the highest individual score (????????) by an ???????? keeper in T20Is ????????#OneFamily #MumbaiIndians #INDvSL @ishankishan51 pic.twitter.com/H75BKMyMp4
— Mumbai Indians (@mipaltan) February 24, 2022
वेस्ट इंडिज दौऱ्यात ईशान किशनचा फॉर्म ढासळला होता. त्याने तिन्ही सामन्यात केवळ ७१ धाव केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मानेही त्याला मैदानावरच फॉर्म बाबत सुनावले होते. वेस्ट इंडिज दौऱ्यातील खराब कामगिरीच्या विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ईशानने त्याची ताकद दाखवून दिली आहे. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ईशान किशनने आनंद व्यक्त करत वेस्ट इंडिज दौऱ्यातून शिकायला मिळाल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL : भारताने मालिकेतला पहिला सामना जिंकला
- “…ते प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं”, रोहित पवारांचे ट्विट चर्चेत
- Russia-Ukraine war : जागतिक दबाव तरी, युक्रेनमध्ये रशियाचे आक्रमण दुसऱ्या दिवशीही सुरूच
- “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” मधील २ नावे मी विसरलो, ती म्हणजे…”, सोमय्यांचा हल्लाबोल
- Russia-Ukraine war : “…हे तुमचे-आमचे वास्तव”, युक्रेनने केलेले हिटलर-पुतिन यांचे कार्टून ट्विट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

