🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाने टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ६२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.तसेच भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ईशान किशनच्या शानदार ८९ धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे.
लखनऊ एकना स्पोर्ट्स सिटी येथे झालेल्या पहिल्या T20 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ज्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशनने दमदार सुरुवात केली. ईशान आणि रोहित या दोघांनी मिळून विक्रमी १११ धावांची भागीदारी रचली आहे. रोहित शर्माने ४४ धावा तर ईशानने ८९ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ईशानने भारताला तारले. ज्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला २० ओव्हरमध्ये १९९ धावपर्यंत नेले.
भारताच्या १९९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ २० ओव्हरमध्ये केवळ १३७ धावा करू शकला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन तर युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. चहलने जसप्रीत बुमराहला मागे टाकून T20I मध्ये भारताचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. भारताने सलग १० सामने जिंकण्याचा विक्रम देखील यावेळी बनवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” मधील २ नावे मी विसरलो, ती म्हणजे…”, सोमय्यांचा हल्लाबोल
- Russia-Ukraine war : “…हे तुमचे-आमचे वास्तव”, युक्रेनने केलेले हिटलर-पुतिन यांचे कार्टून ट्विट चर्चेत
- Russia-Ukraine war : बायडेन रशिया-युक्रेन संघर्षावर भारतासोबत चर्चा करणार
- शिवसेनेला धक्का? यशवंत जाधवांच्या घरी ईडीची धाड; चौकशी सुरु
- ‘खरं खोटं नक्की बाहेर येईल, हुरळून जायची गरज नाही’; किशोरी पेडणेकरांचा टोला


