Share

IND vs SL: भारताची श्रीलंका विरुद्ध मालिका आजपासून सुरु होणार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी २० मालिकेत पराभूत करून भारतीय विजयी मनस्थितीत श्रीलंका विरुद्ध खेळण्यास उतरणार आहे. तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेत श्रीलंका आणि भारतीय संघ लढण्यास आजपासून मैदानावर उतरणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर श्रीलंका दासून शनाकाच्या कर्णधारपदात खेळेल.

श्रीलंका दौरा सुरु होण्याआधीच भारतीय संघातील अनेक नाव संघातून बाहेर पडले आहे. वर्क लोड मॅनेजमेंट ठेवण्यासाठी बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या टी २० पासून श्रीलंकेविरुद्ध टी २० मालिकेतही ऋषभ पंत आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. हे दोघेही कसोटी मालिकेसाठी संघाशी जोडले जातील. तर वेस्ट इंडिज विरुद्ध शानदार कामगिरी करणार सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर हे दोघे सुद्धा दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे यंदा नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच दुखापतीतून बाहेर येत रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करणार आहे.

श्रीलंका भारताच्या या दौऱ्यावर ३ सामन्यांची टी २० मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला टी २० सामना आज (२४ फेब्रुवारी) ला लखनऊ येथे खेळवला जाणार आहे. तर पुढचे दोन सामने २६ आणि २८ तारखेला खेळवले जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!