Share

मोठी बातमी : नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी निगडित जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान मलिक यांच्या अटकेनंतर संपुर्ण राज्यात गृहमंत्रालाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवाब मलिकांची आज पहाटेपासून ईडीकडून ८ तास चौकशी करण्यात आली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झाली. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

…तोपर्यंत नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास नेत्यांची मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले, “मोठी दुर्देवाची गोष्ट आहे. नवाब मलिकांना ईडीने चौकशी करुन अटक केली. न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. १९९२ सालची घटना वर काढण्यात आली. नवाब मलिक भाजप सरकारच्या विरोधात बोलतात, अन्यायाविरोधात बोलतात त्यामुळे त्यांचे तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. मंत्र्यांवर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे. आम्ही या अन्यायाचा विरोध करत आहोत. उद्या १० वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही निषेध करणार आहोत. त्यानंतर राज्यभरात शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही. तोपर्यंत नवाब मलिकांचा राजीमाना घेण्याचा काही प्रश्न नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!