Share

“…तर युक्रेनहून बरेच विद्यार्थी वेळेवर परतले असते”, भूपेश बघेल यांची केंद्र सरकारवर टीका

Published On: 

नवी दिल्ली: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे निर्वासन उड्डाण रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर निर्वासितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तर दुसरीकडे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“खार्किव आणि कीवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी भारत सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांना सीमेजवळ आणावे जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. तसेच, इव्हॅक्युएशन प्लेनची संख्या वाढवायला हवी”, अशी मागणी भूपेश बघेल यांनी केली आहे.

तसेच एअर इंडियाने तिकिटांचे भाडे 24,000-25,000 वरून 60,000-80,000 रुपये केले आहे, तेच असते तर आणखी बरेच विद्यार्थी वेळेवर परत आले असते असा आरोपही बघेल यांनी केला आहे. दरम्यान एअर इंडियाची तिसरी फ्लाइट AI1940 जे हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून निघाले होते, ते देखील रविवारी (२७ फेब्रुवारी)दिल्लीला पोहोचले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत ट्वीटरवर माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!