🕒 1 min read
कोलकत्ता : भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील विळ्या भोपळ्याचे वैर संपूर्ण भारताला माहिती आहे. पश्चिम बंगाल मधील कोणतीही निवडणूक असली तरी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वादावादी ही होतच असते. कधीकधी हिंसाचाराला देखील खतपाणी घातले जाते. असाच काहीसा प्रकार आज पश्चिम बंगालमधील नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान घडला आहे.
पश्चिम बंगालमधील १०८ नगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक होत आहे. परंतु असे असले तरी आज हिंसाचाराला आमंत्रण मिळालेच. नॉर्थ २४ परगाणामध्ये मतदानावेळी तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद उफळून हाणामारी झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. पश्चिम बंगाल पोलीस ममता बॅनर्जी यांच्या इशाऱ्यावर काम करत असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुद्दामून लक्ष केले जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी चालू आहे असा आरोप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदानास जाऊन देत नाहीयेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते अर्जुन सिंग यांनी केला आहे. राज्यातील पोलीस पण तृणमूलच्या गुंडांना सामील असून दोघे मिळून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. या प्रकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले असता भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमधील कार्यकर्त्यात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार आज घडला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “…तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही”, सुभाष देसाईंचा इशारा
- Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतात येण्यास तरुणीने दिला नकार; कारण कौतुकास्पद
- “भाजपशासित राज्यांमध्ये इन्कमही नाही आणि टॅक्सही नाही”, राऊतांचा हल्लाबोल
- जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळायला हवं- अजित पवार
- “मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवतो”, अभिजित बिचुकलेंचे मोठे वक्तव्य


