🕒 1 min read
मुंबई: विराट कोहली गेल्या काही काळापासून सर्वच फॉरमॅटमध्ये खराब कामगिरीचा शिकार होत आहे. विराटने आंतरराष्ट्रीय शतक झळकावून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, त्याचा शेवटचा शतक २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध डे नाईट कसोटी दरम्यान आला होता. ७३ डावात एकही शतक न आल्याने आता त्याची सरासरी ५० च्या खाली गेली आहे. विराटची कामगिरी बघता क्रिकेट रसिकांसह माजी खेळाडू देखील चिंतीत आहे.
विराटच्या (virat kohli) ढासळत्या कामगिरीवर बोलताना वासिम जाफर (wasim jaffer) म्हणाले “विराट तो खेळाडू नाहीये, तो दुर्दैवी राहिला आहे . जेव्हा तुमची त्याच्यासारखी कारकीर्द असेल, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या स्थितींना सामोरे जावे लागते. आपण नेहमीप्रमाणेच त्याचे ७१ वे शतक लवकर येईल अशी आशा करत होतो. ही पुन्हा ७१ व्या शतक जरी नसले तरी त्याला किमान ५०-६० धावा काढताना बघायला आवडेल.”
दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीला कोहलीची सरासरी ५० च्या वर होती. पण या मालिकेतील तीन डावात त्याने अनुक्रमे ४५, २३,१३ धावा केल्या आहेत. २०१७ नंतर प्रथमच विराटची कसोटीत सरासरी ५० च्या खाली गेली आहे. कसोटी क्रिकेटमधील सरासरी ४९.९६ वर घसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, त्यांना खुजं करु नका”, संजय राऊतांचे वक्तव्य
- हिंदू मतांचे ध्रुवीकरण करायला ओवेसींची योजना करण्यात आली- संजय राऊत
- “बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात…”, इम्रान खान संतापले
- VIDEO: सेक्युरिटी तोडून चाहता मैदानावर विराटकडे धावला; पुढे जे झाले ते पाहून क्रिकेटरसिक हैराण!
- शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
