Share

शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले – नरेंद्र मोदी

Published On: 

मुंबई : शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक झाल्यापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. त्यानंतर मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांचे नाव दाऊदशी जोडले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून पवारांचे संबंध दाऊदशी जोडण्यात आले.

या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला असून व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, “एक दशक होत जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड च्या ताब्यात गेली. तर काय होईल, असा प्रश्न होता. त्यावेळी शरद पवार यांनी हिंमत आणि कौशल्याने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं.” असे वक्तव्य मोदींनी केले होते.

या व्हिडिओवर “अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत? ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक-बक चालू ठेवावी”, असे कॅप्शन जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

दरम्यान, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ‘अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो’, असे वक्तव्य केले होते. तसेच आझाद मैदानातील मोर्चादरम्यान भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) देखील शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात निलेश आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!