मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पाच राज्यांच्या निवडणूक निकाला संदर्भात भाष्य केले आहे. तसेच चार राज्यांत विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळाला असे आता कितीही सांगितले तरी ते खरे वाटणारे नाही . मतांचे ध्रुवीकरण, प्रचंड धूळफेक आणि इतर बरेच काही हाताशी असल्यानेच भाजपला विजय मिळाला, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘ओवेसी हे उत्तर प्रदेशात खास अवतरले ते काय मुसलमानांची मते घ्यायला? ओवेसींची योजना करण्यात आली ती हिंदू मतांचे ध्रुवीकरण करायला, हिंदूंना चिथावणी द्यायला. त्यात आता यश मिळाले, पण हे आणखी किती काळ चालणार? देशात हे असेच चालणार काय? विचार करावा असे वातावरण आहे, पण विचार करण्याची क्षमता मारून टाकली आहे. विजय त्यातूनच मिळाला आहे’, असे राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘उत्तर प्रदेश निवडणुकीत बसपाचा पराभव झाला याचा ठपका मायावती यांनी प्रसारमाध्यमांवर ठेवला. प्रसारमाध्यमांनी बसपाला भाजपचीच ‘बी टीम’ ठरवल्याने बसपाचा पारंपरिक मुस्लिम मतदार समाजवादी पक्षाकडे वळला, तर समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास राज्यात जंगलराज निर्माण होईल या भीतीपोटी बसपाच्या इतर मतदारांनी भाजपकडे मते वळवली. मायावती यांनी हे महनीय विचार उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाल्यावर व्यक्त केले. निवडणुकीच्या मैदानात त्या नव्हत्याच. समाजवादी पक्षापेक्षा भाजप बरा. समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, या त्यांच्या वक्तव्यातून मायावती त्यांच्या ‘व्होट बँके’ला एक प्रकारे सूचनाच देत होत्या. ओवेसीच्या बाबतीत तेच घडले. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे निवडणुकीची रणनीती ठरवून घेतो व त्यानुसार ते पुढे जातात. निवडणूक जिंकण्याचे हे राजकीय व्यवस्थापन त्यांच्या पक्षासाठी चांगले असले तरी लोकशाही, समाजरचना उद्ध्वस्त करणारे आहेत.’
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी मुंबईला हिंमत आणि कौशल्याने अंडरवर्ल्डपासून वाचवले – नरेंद्र मोदी
- VIDEO: सेक्युरिटी तोडून चाहता मैदानावर विराटकडे धावला; पुढे जे झाले ते पाहून क्रिकेटरसिक हैराण!
- “बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात…”, इम्रान खान संतापले
- योगी आणि महाराजांची जागा मठात असून राजकारणात नाही; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोविड पॉझिटिव्ह; नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

