Share

“बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी आपण राजकारणात…”, इम्रान खान संतापले

Published On: 

नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister of Pakistan Imran Khan) यांनी संसदेत आपल्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याचा आरोप केल्याबद्दल विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी त्यांनी संतापलेले उद्गार काढत टीका केली.

“मी बटाटे आणि टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी राजकारणात सामील झालो नाही. मी देशाच्या तरुणांच्या फायद्यासाठी सामील झालो”, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते पंजाब प्रांतातील हाफिजाबाद शहरात एका राजकीय सभेत बोलत होते.

दरम्यान पुढे त्यांनी म्हटले की, “पैशाचा वापर करून कायदे करणाऱ्यांना विकत घेऊन त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांच्या विरोधात राष्ट्र उभे राहील. मात्र आमच्या उर्वरित कार्यकाळात पाकिस्तान एक महान देश बनणार आहे आणि आमच्या सरकारने जाहीर केलेल्या योजनांचे परिणाम लवकरच दिसून येतील.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!