Share

VIDEO: सेक्युरिटी तोडून चाहता मैदानावर विराटकडे धावला; पुढे जे झाले ते पाहून क्रिकेटरसिक हैराण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत-श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहते इतके अनियंत्रित झाले की ते थेट मैदानावर पोहोचले. काही प्रेक्षक स्टॅंडवरून धावत मैदानावर पकडले गेले. यासंबंधीचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराटचे चाहते त्याला भेटायला सामना सुरु असतानाच मैदानावर पोहचले. मात्र यात विशेष म्हणजे विराटने चाहत्यांना बघून केलेल्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

झाले असे की, श्रीलंकेच्या डावाच्या सहाव्या षटकात मोहम्मद शमीचा (mohmmad shami) चेंडू कुशल मेंडिसला (kushal mendis) लागला आणि खेळ काही काळ थांबवावा लागला. पण, चाहत्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि थोड्याच वेळात विराट कोहलीला (virat kohli) भेटायला मैदानावर धावायला सुरुवात केली. त्याच्या पर्यंत पोहोचताच चाहत्यांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/SubbuSubash_17/status/1503042495776624641?s=20&t=8x0Onzrc68KSQQqrlGHLIw
https://twitter.com/its_King18/status/1503044397495062531?t=_7q7UDdIAb1h8X-vKNHMfQ&s=19

बँगलोरमधील चाहते कसलीही पर्वा न करता आपल्या आवडत्या स्टार खेळाडूपर्यंत पोहोचले. यात विशेष म्हणजे विराट कोहलीनेही त्यांना झिडकारून न लावता त्यांच्यासोबत सेल्फी काढला. त्यानंतर मैदानावर येणारे प्रेक्षक पाहून पोलिसांनी तत्परता दाखवत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढले. चाहत्यांची सामना दरम्यान मैदानात घुसखोरी नवीन नाही. याआधीही रोहित शर्मा , धोनी आणि सचिनला भेटायला चाहते थेट मैदानावर पोहचले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!