मुंबई: डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा बेंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता. अक्षरला संघात जागा देण्यासाठी कुलदीप यादवला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. चिन्नास्वामीवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी मालिकेत जर अक्षराला संधी मिळाली तर त्याच्याकडे १३३ वर्ष जुना रेकॉर्डची बरोबरी साधायची मोठी संधी आहे.
अक्षरने (akshar patel) गेल्या वर्षी त्याच्या कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. जिथे त्याने इंग्लिश फलंदाजांभोवती जाळे फिरवले आणि भारताला घरच्या मालिकेत पुनरागमन करण्यास मदत केली. सोबतच मालिकेत २७ विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतर तो न्यूझीलँडविरुद्ध खेळला आणि कानपूरमधील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने पाच विकेट्स मिळवल्या. आता अक्षर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० बळी घेणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. अक्षरने पुढच्या तीन डावात फक्त ४ विकेट्स मिळवल्या त्याच्या नावे आता ५ कसोटी सामन्यांनंतर ३६ विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन चार्ल्स टर्नरने (charles turner) १८८० मध्ये केला होता आणि त्याने हा टप्पा गाठण्यासाठी ६ कसोटी सामने घेतले होते. दक्षिण आफ्रिकेचा व्हर्नन फिलँडर (Vernon Philander) या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या किंवा तोडण्याच्या जवळ आला होता पण त्याने आपल्या ७ व्या कसोटीत ५० विकेट्सचा टप्पा गाठला. अक्षरला त्याच्या पुढील कसोटी सामन्यात १४ विकेट्स घेण्याची गरज आहे, जे या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी पुरेसे राहील. या सामन्यात रोहित अक्षरला संधी देतो का हे पाहणे रंजक असेल.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL: दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार नवीन इतिहास ; ‘हा’ मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी सज्ज!
- “चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या फिंचची आयपीएलमध्ये ‘या’ संघात लागली वर्णी!
- ‘राधे श्यामने’ रीलीझ पूर्वीच जमवला २०० कोटींचा गल्ला…!
- अर्थसंकल्पात कृषी विभागासह ‘या’ १४ विभागांना निधी जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

