मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडेचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राधे श्याम’ चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रभासचे चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला होता, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. मात्र आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रभासच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे..
प्रभास हा दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीचा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याला ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक केले गेले होते. या चित्रपटाच्या यशाने प्रभासच्या मानधनात सुद्धा मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ‘बाहुबली’नंतर प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. मात्र प्रभासच्या लोकप्रियतेवर याचा काहीही नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला नाही. कारण आता प्रदर्शित झालेल्या ‘राधे श्याम’ चित्रपटाचे एडवान्स बुकिंग झाले आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
अभिनेता प्रभासची लोकप्रियता पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी दक्षिणेतच ५ते ६ कोटीचा गल्ला जमवेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाला जोरदार टक्कर देण्यासाठी आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘द बॅटमॅन’ हे चित्रपट आधीपासूनच चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहेत. त्याचबरोबर ‘राधे श्याम’सोबतच ‘द काश्मीर फाईल्स चित्रपटही प्रदर्शित झाला आहे .
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

