Share

IND vs SL: दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार नवीन इतिहास ; ‘हा’ मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी सज्ज!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय कर्णधार रोहित शर्मा बेंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी बाहेर पडल्यावर एक नवीन इतिहास रचणार आहे. ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटच्या इतिहासातील केवळ नववा भारतीय खेळाडू रोहित बनणार आहे.

रोहित शर्माने (rohit sharma) त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी आतापर्यंत ४४ कसोटी, २३० एकदिवसीय सामने आणि १२५ T20I सामने खेळले आहेत. रोहितने जून २००७ मध्ये भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याच वर्षी त्याचे T20I मध्येही त्याचे पदार्पण झाले. सुरुवातीला त्याची कामगिरी खराब असली तरी त्याने लवकरच भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आपल्या नावाचा डंका वाजवला. रोहितने भारतीय संघाकडून खेळताना दोनदा द्विशतक झळकावले आहे.

रोहित शिवाय सचिन तेंडुलकर (६६४ सामने), एमएस धोनी (५३८), राहुल द्रविड (५०९), विराट कोहली (४५७), मोहम्मद अझरुद्दीन (४३३), सौरव गांगुली (४२४), अनिल कुंबळे (४०३ ) आणि युवराज सिंग (४०२ ) हे ४०० हून अधिक सामने खेळलेले इतर भारतीय आहेत. तर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय इतिहासात सर्वाधिक कॅप्स असलेला खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!