मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘महाराष्ट्राला मोडायचे, वाकवायचे, त्यास गुडघ्यावर आणायचे यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर महाराष्ट्राला अन्यायाविरोधात लढावेच लागेल. कधीकाळी काँग्रेस पक्षही विजयामागून विजय मिळवत होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त काँग्रेसचाच बोलबाला होता. काँग्रेसने दगड उभा केला तरी तो जिंकत होता. आज त्यांचे काय झाले? हा राजकारणातला धडा आहे.’
दरम्यान, चार राज्यांतील विजयाच्या आनंदाने भाजप व त्यांचे पुढारी गदगदून गेले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी या डबल इंजिनाने मोठा विजय मिळवला. आणखी काही दिवस विजयाचा उत्सव व लाडूवाटप सुरू राहील. त्यात काहीच चुकीचे नाही. चार राज्यांतील विजयाने भाजपने इतिहास रचल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. कारण आता ते युक्रेन युद्धाच्या नावाखाली पेट्रोल – डिझेलचे भाव वाढवायला मोकळे झाले व भाव वाढविण्याचा कौल चार राज्यांतील जनतेने दिल्याचे सांगायलाही ते मागे राहणार नाहीत, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राधे श्यामने’ रीलीझ पूर्वीच जमवला २०० कोटींचा गल्ला…!
- अर्थसंकल्पात कृषी विभागासह ‘या’ १४ विभागांना निधी जाहीर
- ‘भाजपची कोणतीही लाट नाही’ – अमोल मिटकरी
- अभिषेकने वडील ‘अमिताभ बच्चन’ यांच्याबद्दल अस काय सांगितले की…
- ‘समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

