🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटक येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने दमदार खेळी खेळली. त्याने या सामन्यात ४६ चेंडूत ८१ धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनला आशा आहे की, भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयी खेळी खेळल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुधारेल. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर संघातून वगळलेल्या क्लासेनला त्यानंतर वनडे संघात स्थान मिळाले नाही. यानंतर त्याला करारबद्ध खेळाडूंच्या यादीतूनही वगळण्यात आले होते. रविवारी दुसऱ्या टी-२० मध्ये (IND vs SA) क्विंटन डी कॉकला त्याच्या मनगटाच्या दुखापतीमुळे क्लासेनला संधी मिळाली तिच्या त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने ४६ चेंडूत ८१ धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
हेनरिक क्लासेन सामन्यानंतर म्हणाला की, ‘या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. मी सकारात्मक राहून माझा नैसर्गिक खेळ करण्याचा निर्णय घेतला. माझी ही रणनीती फलंदाजीत प्रभावी ठरली.’ क्लासेन ८ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसरा सामना उद्या विशाखापट्टणम येथे होणार आहे. भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार आहेत. संघाला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार ऋषभ पंतवर आता दडपण असेल.
क्लासेन पुढे म्हणाला की, ‘माझ्या कारकिर्दीतील अशा महत्त्वाच्या वळणावर मी ही खेळी खेळली हा देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे माझी कारकीर्द थोडी लांबेल अशी आशा आहे. पहिल्या टी-२० सामन्यात रॅसी व्हॅन डर डुसेन आणि डेव्हिड मिलर यांनी नाबाद अर्धशतके झळकावून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात क्लासेनने उत्कृष्ट खेळी केली. दुसऱ्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये ३ गडी बाद झाल्यानंतर त्याने कर्णधार टेंबा बावुमासोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Career-best score✔️
Heinrich Klaasen ????#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/6RFhtaeh0S— Proteas Men (@ProteasMenCSA) June 12, 2022
भारतीय संघाने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग ७ आंतरराष्ट्रीय सामने गमावले आहेत. टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. पण संघाची सर्वात मोठी चिंता गोलंदाजीची आहे. पहिल्या सामन्यात २११ धावा केल्यानंतरही भारतीय संघ धावसंख्येचा बचाव करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात फक्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार प्रभाव पाडू शकला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
