Share

“संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली” ; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप!

Published On: 

 

मुंबई :  राज्यात नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी विधानपरिषेदेची निवडणूक येत्या २० जूनला होणार आहेत. सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली असल्याचे, खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “आमचे आमदार फुटलेले नाहीत, तुमचं नशीब फुटलयं ते बघा.”

मात्र किरीट सोमय्यांनी याबाबत संजय राऊतांनर आरोप केले आहेत. आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेेने महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचं सोमय्या म्हणाले. इतकच नाही तर संजय राऊत यांनी थेट आमदारांना बंदूक दाखवून धमकीच दिली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. याबाबत तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, शिवसेनेनं राज्यसभेची ही निवडणूक भ्रष्ट केली असल्याचा आरोपही, किरीट सोमय्यांनी यावेळी केला. सोमयांच्या या आरोपांवर निवडणूक आयोग काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!