Share

“म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी…” ; सदाभाऊंनी विधानपरिषदेचा अर्ज मागे घेतल्यानंतर अमोल मिटकरींचे टोमणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. भाजपमधील चर्चित नावांना मागे सारत सदाभाऊंनी अर्ज दाखल केला होता. मात्र आज सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे. भाजपाने आता या निवडणुकीत ५ उमेदवारांना उभे केले होते. तर सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उभे केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी – काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत.

सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार निशाणा साधाला आहे. “सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणून फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिला, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणवीसांना सांगा, म्हणावं, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हटले, “महाविकास आघाडीकडे मते जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीकडे ४ निवडून येतील एवढी मते आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे.” भाजपा नेते प्रविण दरेकर म्हणाले, “काँग्रेसनं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा मग बिनविरोध निवडणुकीबाबत विचार केला जाईल”

राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांवर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप यांच्यातील संघर्ष पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!