नागपूर : मागील तीन दिवसांपासून केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ या सैन्य भरतीच्या योजनेच्या विरोधात हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये आंदोलन पेटलं आहे. ‘अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणारे तरुण ४ वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून देशाची सेवा करतील. यातल्या २५ टक्के तरुणांना पुढे संधी दिली जाईल, अशी तरतूद या योजनेत आहे.
पण मग उरलेल्या ७५ टक्के तरूणांच काय होणार? त्यांना दुसरी नोकरी देण्याबद्दल सरकारकडे काही तरतूद करण्यात आली आहे का ? असे प्रश्न घेऊन तरुणांनी हे आंदोलन केल आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं दिसत आहे.
त्याबरोबरच कॉंग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या ईडी कारवाईबाबत देशात अनेक ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्त्यांकडून आंदोलनं केली जात आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी भाष्य केलं आहे.
विरोधकांकडे मुद्दा नसल्याने उगाच विवाद तयार केला जात असल्याचं व्ही.के. सिंह म्हणाले आहेत. विरोधकांकडे दुसरे काही नाही म्हणुन ईडी, आणि हा मुद्दा पुढे करत आहेत असं व्ही.के.सिंह म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

